Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद घेत आहे अखेरचा श्वास; पोलीस महासंचालकांचे आश्वासक उद्गार

पाकिस्तान अजूनही काश्मीर खोऱ्यातील शांतता प्रक्रिया खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, याची जम्मू-काश्मीर पोलीस काळजी घेतील, असे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले.

168
Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद घेत आहे अखेरचा श्वास; पोलीस महासंचालकांचे आश्वासक उद्गार
Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद घेत आहे अखेरचा श्वास; पोलीस महासंचालकांचे आश्वासक उद्गार

गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाच्या विळख्यात सापडलेले जम्मू-काश्मीर हळूहळू सामान्य स्थितीत परतत आहे आणि भीतीच्या मानसिकतेतून लोक बाहेर पडत आहेत. (Jammu And Kashmir) यावर्षी 10 स्थानिक तरुण दहशतवादी गटात सामील झाल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी 110 तरुण दहशतवादी गटात सहभागी झाले होते. केंद्रशासित प्रदेशात दहशतवादाचा अखेरचा श्वास घेतला जात आहे. 1980 च्या दशकात दहशतवाद उफाळून आल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये ही संख्या सर्वांत कमी आहे, असे आश्वासक उद्गार जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी काढले. पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Jammu And Kashmir)

दिलबाग सिंग पुढे म्हणाले की, ”पाकिस्तान अजूनही काश्मीर खोऱ्यातील शांतता प्रक्रिया खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद अखेरचा श्वास घेत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस तो पूर्णपणे संपवण्याची कामगिरी पार पाडतील.” काश्मीर खोरे पूर्णपणे शांततापूर्ण बनवण्याचे स्वप्न अखेर साकार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Lalit Patil: ड्रगमाफिया ललित पाटीलला मेफेड्रॉनचा फॉर्म्युला कोणी सांगितला ? वाचा सविस्तर)

“गेल्या 3 दशकांत खोऱ्यातील दहशतवादाशी लढताना 1600 हून अधिक सुरक्षा दलांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. पाकिस्तान येथे दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे आणि आपल्या सैन्याच्या बलिदानाचे परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळेच खोऱ्यात दहशतवाद अखेरचा श्वास घेत आहे. जम्मू आणि काश्मीर लवकरच दहशतवादमुक्त होईल. देशासाठी आणि शांततेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक शहीदाला आम्ही सलाम करतो”, असे दिलबाग सिंग म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरमधील सीमापार दहशतवादी तळ आणि घुसखोरीच्या प्रयत्नांविषयी बोलताना डीजीपी म्हणाले की, अनेक तळ रिकामे करण्यात आले आहेत, तर अजूनही आंतरराष्ट्रीय सीमेवरील सियालकोटमध्ये आणि गुरेझ सेक्टरच्या पलीकडे नियंत्रण रेषेजवळ अनेक तळ सक्रीय आहेत. पाकिस्तान वारंवार दहशतवाद्यांना काश्मीरच्या हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न करतो; परंतु यापैकी 90 टक्क्यांहून अधिक प्रयत्न हाणून पाडण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. नियंत्रण रेषेवर तैनात असलेले सुरक्षा दल नेहमीच सतर्क असते. (Jammu And Kashmir)

एन.आय.ए. आणि एस.आय.ए. सारख्या विविध तपास संस्थांकडून नार्को दहशतवादाचा काटेकोरपणे सामना केला जात आहे, असेही ते म्हणाले. “रामबन परिसरात आम्हाला मोठे यश मिळाले आहे, जिथे आम्ही सुमारे 30 किलो अमली पदार्थ जप्त केले. हे जाळे तुटले होते आणि आता आमच्या लक्षात आले आहे की, ते उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यापासून पंजाबशी जोडले गेले आहे. उत्तराखंडमध्येही काही दुवे सापडले आहेत “, असे डीजीपी म्हणाले. (Jammu And Kashmir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.