जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) विधानसभा निवडणुकीवर (assembly election) आतंकवादी हल्ल्यांचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या भागात अतिरिक्त लष्करी सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सैनिकांच्या दहशतवाद्यांसोबत चकमकी सुरू आहेत, तर बऱ्याच ठिकाणी शोध आणि शोधमोहिमा सुरू आहेत. डोडा (Doda) आणि किश्तवाड (Kishtwar) यांसारख्या संवेदनशील भागांत ५ ते ६ हजार अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Cyber Crime : मुंबई उच्च न्यायालयाच्या नावेच फसवणूक; सायबर चोरट्यांचा पावणेबारा लाख रुपयांवर डल्ला)
हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या सर्व परिसरात ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. काश्मिरी पंडित, राजकीय कार्यकर्ते, पर्यटक, बिहार-उत्तर प्रदेशचे नागरिक हे आतंकवाद्यांचे लक्ष्य असू शकते, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्यात येत आहे.
आक्रमणांची संख्या वाढली
जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे या परिसरातील आतंकवादी आक्रमणांमध्ये वाढ झाली आहे. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये ४१ अतिरेकी मारले गेले, तर सुरक्षा दलाचे २० सैनिक हुतात्मा झाले. १८ नागरिकांचाही या आक्रमणांमध्ये बळी गेला आहे, तर जम्मू भागात सुमारे ५० सैनिक हुतात्मा झाले आहेत. येथील वन क्षेत्रात गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांशिवाय, ग्राम संरक्षण दल (व्हिडीजी) दुसऱ्या टप्प्याचे संरक्षण म्हणून काम करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community