दहशतवाद हा जागतिक शांततेसाठी गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून PM Narendra Modi यांचा इशारा

46
दहशतवाद हा जागतिक शांततेसाठी गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून PM Narendra Modi यांचा इशारा
दहशतवाद हा जागतिक शांततेसाठी गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून PM Narendra Modi यांचा इशारा

एकीकडे दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे, तर दुसरीकडे सायबर सुरक्षा, सागरी आणि अवकाश ही संघर्षाची नवीन क्षेत्रे बनत आहेत. तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी संतुलित नियमन आवश्यक आहे. आम्हाला जागतिक डिजिटल प्रशासन हवे आहे, ज्यामध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित राहील. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) एक पूल बनावा, अडथळा नाही. जागतिक भल्यासाठी भारत आपला DPI सामायिक करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

(हेही वाचा – न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे ‘न्याय आपल्या दारी’; CJI Chandrachud यांनी सांंगितला वाढता आवाका)

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शनिवारी (21 सप्टेंबर) अमेरिकेत दाखल झाले. या कालावधीत त्यांनी जो बायडेन यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. पंतप्रधान मोदींनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. यामध्ये द्विपक्षीय संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. 23 सप्टेंबर या दिवशी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या 79 व्या सत्रात बोलतांना पंतप्रधान मोदींनी जागतिक दहशतवाद आणि शांततेच्या मुद्द्यावर आपली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.

शाश्वत विकास यशस्वी होऊ शकतो

क्वाड शिखर परिषदेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी येथे भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी आलो आहे. आम्ही भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. शाश्वत विकास यशस्वी होऊ शकतो, हे आम्ही भारतात दाखवून दिले. यशाचा हा अनुभव जगासोबत शेअर करण्यास आम्ही तयार आहोत. मानवतेचे खरे यश आपल्या सामूहिक सामर्थ्यात, युद्धभूमीवर नाही. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमधील सुधारणा महत्त्वाच्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.