गुजरातच्या रतलाममध्ये बॉम्ब बनविण्याचे दोन दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आलेला अकिफ नाचन हा मुंबई,पुण्यात मोठा घातपात घडवून आणण्यासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनविण्याच्या तयारीत होता, तत्पूर्वी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) त्याला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असणाऱ्या पडघा येथून गेल्या आठवड्यात अटक केली आहे.
अकिफ नाचन हा केवळ बॉम्ब बनविण्याची तयारी करीत नव्हता तर इसिसचे महाराष्ट्र मॉड्युलमधील संशयितांना मदत देखील करीत होता, असेही एनआयएच्या तपासात समोर आले आहे. अकिफ नाचन हा एनआयएने अटक केलेला सहावा संशयित आहे. एनआयएने मुंबईतील नागपाडा येथून मागील महिन्यात इसिसचे महाराष्ट्र मॉड्युलमधील संशयित तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातील पडघा येथून शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला आणि डॉ. अब्दुल पठाण यांना अटक केली होती.
पडघ्यातून अटक करण्यात आलेले झुल्फिकार अली बडोदावाला आणि शरजिल शेख या दोघांची पडघ्यात राहण्याची सोय अकिफ याने केली होती. झुल्फिकार याच्या चौकशीत अकिफ याचे नाव समोर आल्यानंतर एनआयए त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करून गेल्या आठवड्यात एनआयए त्याच्या घरी छापा टाकून अकिफ याला ताब्यात घेऊन त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट, आणि काही कागदपत्रे जप्त करून अकिफला अटक करण्यात आली. बोगस ओळखपत्र तयार करणे आणि इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याव्यतिरिक्त पुण्यातून अटक करण्यात आलेल्या इम्रान आणि डॉ.अब्दुल कादिर पठाण यांना पुण्यातील कोंढवा येथील घरात तर झुल्फिकार आणि शरजिल यांना पडघ्यात राहण्याची सोय केल्याचा आरोप अकिफ नाचन याच्यावर आहे.
अकिफने इसिस या दहशतवादी संघटनेला महाराष्ट्रात पसरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र एटीएसने अटक केलेले आणि नुकताच एनआयए कडून ताबा घेऊन अटक करण्यात आलेला झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि अब्दुल कादिर पठाण अकिफ हा यांच्या सतत संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. मध्ये कोंढवा येथे बॉम्ब बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते आणि त्यात भाग घेतला होता.डेमो आयडी तयार करण्यात आणि या ठिकाणी नियंत्रित स्फोट घडवण्यातही सर्वांचा सहभाग होता.
Join Our WhatsApp Community