जम्मू-काश्मीरमध्ये (Terrorist Attack) रविवारी श्रीनगरच्या ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला गोळी लागली. त्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.
याविषयी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी हे ईदगाह ( idgah) मैदानात काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होते, तेव्हा काही दहशतवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांना गोळी लागली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – India vs England : भारताचा विजयी षटकार; भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची उडाली दाणादाण )
काश्मीर झोन पोलिसांनी याविषयी Xवर म्हटले आहे की, दहशतवादी घटना घडवण्यासाठी पिस्तूलचा वापर करण्यात आला आहे. या घटनेनंतर तात्काळ परिसरात नाकाबंदी करण्यात आली. दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Join Our WhatsApp Community