Shahid Latif : पाकिस्तानमध्ये आणखी एका दहशतवाद्याची हत्या; पठाणकोट हल्ल्याशी जवळचा संबंध 

172
Shahid Latif : पाकिस्तानमध्ये आणखी एका दहशतवाद्याची हत्या; पठाणकोट हल्ल्याशी जवळचा संबंध 
Shahid Latif : पाकिस्तानमध्ये आणखी एका दहशतवाद्याची हत्या; पठाणकोट हल्ल्याशी जवळचा संबंध 

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड शहिद लतीफ याची सियालकोटमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. (Shahid Latif) त्याच्यासोबत आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. भारत सरकारने शहिद लतीफ याला ‘मोस्ट वाँटेड’ म्हणून घोषित केले  आहे. तो जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सदस्य होता. लतीफ हा मूळचा पाकिस्तानातील गुजरांवाला शहरातील आहे. (Shahid Latif)

(हेही वाचा – Pune : ड्रगमाफिया ललित पाटीलच्या भावाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पुणे पोलिसांची मोठी कारवाई)

शहिद लतीफला 1994 मध्ये अटक करण्यात आली होती. न्यायालयात खटला चालला आणि त्याला 16 वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर लतीफला 2010 मध्ये वाघा बॉर्डर पाकिस्तानला पाठवण्यात आले होते. त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोट एअरफोर्स स्टेशनमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा त्याने कट रचला. पठाणकोट एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसलेल्या 4 दहशतवाद्यांचा तो हँडलर होता. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाचाही त्याच्यावर आरोप होता.

पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यात एकूण सात जवान शहीद झाले होते. पठाणकोट एअरबेसला अधिक सामरिक महत्त्व आहे. ते पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे आणि येथे शस्त्रास्त्रांचा साठाही आहे. युद्धाच्या काळात त्याची भूमिका वाढते, 1965 आणि 1971 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धांमध्ये पठाणकोट एअरबेसची भूमिका महत्त्वाची होती. भारतविरोधी कृत्ये करणाऱ्या आतंकवाद्यांच्या हत्या करण्याचे सत्र चालू आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी अफगाणिस्तानमध्ये एजाज अहमद अहंगर, 26 फेब्रुवारी 2023 रोजी पाकिस्तानमध्ये सय्यद खालिद रझा, तर सय्यद नूर याला 4 मार्च 2023 रोजी पाकिस्तानात कंठस्नान घालण्यात आले आहे.  (Shahid Latif)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.