Jharkhand मध्ये बांगलादेशातील आतंकवाद्यांनी दिले मुसलमानांना प्रशिक्षण

झारखंडमधील (Jharkhand) आतंकवादविरोधी पथकाला ही माहिती मिळाली आहे. यामुळे राज्यात अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे.

58

बांगलादेशातील (Bangladesh) आतंकवाद्यांनी झारखंडमधील मुसलमानांना आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांगलादेशी आतंकवादी झारखंडमध्ये घुसले आणि राज्यातील पाकूरमध्ये काही मुसलमानांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते परत गेले. झारखंडमधील (Jharkhand) आतंकवादविरोधी पथकाला ही माहिती मिळाली आहे. यामुळे राज्यात अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे.

पाकूर येथे प्रशिक्षण घेतलेल्या सर्व १५ जणांची नावे मिळाली आहेत. आतंकवादविरोधी पथकाच्या माहितीनुसार मुर्शिदाबादमधील जलंगी येथील अनेक लोकही या बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा – १९ फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक Chhatrapati Shivaji Maharaj यांची तारखेनुसार जयंती)

बांगलादेशमध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) सरकार पडल्यानंतर बंदी घातलेल्या संघटना भारतविरोधी कारवाया करण्याचा कट रचत आहेत, असे म्हटले जाते. या कटाच्या अंतर्गत बांगलादेशी आतंकवादी (Bangladeshi terrorists) भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भारतात घुसले आहेत. ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशा’चा (Jamaat-ul-Mujahideen Bangladesh, जे.एम्.बी.चा) आतंकवादी अब्दुल मम्मन बांगलादेशातून सीमा ओलांडून आला होता. तो मुर्शिदाबादमधील धुलियान मार्गे पाकूरला पोचला.

६ जानेवारी या दिवशी तो बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून पाकूरला पोचला. तेथील दुबराजपूर येथील ‘इस्लामिक दावत केंद्रा’त जहा-इंडिया आणि जे.एम्.बी. यांच्या आतंकवाद्यांमध्ये एक बैठक झाली. यामध्ये जे.एम्.बी.चा आतंकवादी अब्दुल मम्मन देखील सहभागी झाला. संथाल परगणा भागातील साहिबगंज आणि पाकूर येथे मध्ये बंदी घातलेली जिहादी आतंकवादी संघटना जे.एम्.बी. सक्रिय आहे. या संघटनेशी संबंधित संशयित आणि भूमिगत कार्यकर्त्यांची माहिती त्यांनी गोळा केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.