Tesla in India ? टेस्लाच्या भारतातील प्रवेशाला एप्रिलचा मूहूर्त? सुरुवातीला २ मॉडेल लाँच करण्याची शक्यता

Tesla in India ? टेस्लाने भारतात सध्या नोकर भरती सुरू केली आहे.

121
Tesla Share Price : ट्रम्पना इतका जवळ असूनही एलॉन मस्क यांच्या टेस्ला शेअरमध्ये इतकी घसरण कशी झाली?
  • ऋजुता लुकतुके

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर जगातील सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लाने भारतात येण्याच्या जोरदार हालचाली सुरू केलेल्या दिसत आहेत. अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींची आणि एलॉन मस्क यांचीही भेट झाली होती. त्यानंतर टेस्ला कंपनीने भारतात शोरुम उघडण्याची तयारी सुरू केली आहे आणि खात्रीलायक माहितीनुसार, सुरुवातली टेस्ला कंपनी जर्मनीत तयार झालेल्या टेस्ला गाड्या भारतात विकणार आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात कंपनीचं एक कार्यालय सुरू होणार आहे आणि सुरुवातीला कंपन्या दोन शोरुम मुंबईत असतील. ही कार पूर्णपणे आयात केलेली असल्यामुळे आयात शुल्क धरून एरवी २३ लाखांची टेस्ला कार भारतात ३६ लाख रुपयांना पडेल. (Tesla in India ?)

(हेही वाचा – महाकुंभमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यस्थेत 3 लाख कोटींची वृद्धी; CM Yogi Adityanath यांची विधानसभेत माहिती)

सध्या आयात केलेल्या ईव्ही कारवर ७५% सीमा शुल्क लागते. मात्र कंपनीने केंद्रासमवेत सहकार्य करार केल्यास त्यांना ३५,००० डॉलरहून जास्त किंमतीच्या कारवर १५% सूट मिळते. मात्र त्यासाठी कंपनीने वार्षिक ८ हजारांहून जास्त कार विकता कामा नये, अशी अट आहे. तर दुसरी अट अशी आहे की, अशा कंपन्यांना ५ वर्षात भारतात निर्मिती सुरू करावी लागेल. पण, हे धोरण नजिकच्या काळात बदलण्याची शक्यता आहे. म्हणूनच टेस्लाने भारतातील शोरुमला हिरवा कंदील दाखवल्याचं बोललं जात आहे. (Tesla in India ?)

(हेही वाचा – Manipur मध्ये 17 दहशतवाद्यांना अटक)

एलॉन मस्क सुरुवातीला मॉडेल ३ आणि मॉडेल वाय या दोनच कार भारतात लाँच करतील असा अंदाज आहे. मात्र दोन्ही मॉडेल्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४४ हजार डॉलरहून जास्त आहे. टेस्ला भारतीय बाजारासाठी या कारचे फिचर नेमके काय ठेवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. टेस्लाने महागड्या कार आणल्या तर विक्रीवर परिणाम होऊ शकतो. कंपनीने भारतात पहिल्या दोन शोरूम्ससाठी जागा निश्चित केली आहे. पहिली नवी दिल्लीतील एअरोसिटी क्षेत्र इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे, तर मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सध्ये दुसरी जागा निश्चित केली आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज आंतररराष्ट्रीय विमानतळाजवळील मुख्य बिझनेस हब आहे. या कारसाठी भारतातूनच सुटे भाग खरेदी करता येतील असा मस्क यांचा अंदाज आहे. (Tesla in India ?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.