-
ऋजुता लुकतुके
नुकतीच अमेरिका दौऱ्यात टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती आणि त्यानंतर लागलीच टेस्लाने भारतात नोकरभरती सुरू केली आहे. टेस्लाच्या १३ जाहिराती लिंक्डइन या सोशल मीडिया साईटवर झळकल्या आहेत. टेस्ला आणि भारत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून अधूनमधून चर्चा होत आहेत. पण, भारतातील आयात शुल्क जास्त वाटल्यामुळे मस्क यांनी करारातून हात काढून घेतले होते. पण, आता भारताने ३५ लाख रुपयांच्या वर किंमत असलेल्या कारवरील आयात शुल्क ११० टक्क्यांवरून ७० टक्क्यांवर आणलं आहे. तसंच टेस्लाला भारतात कारनिर्मितीही करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर चर्चा पुढे सरकली आहे. मस्क यांचा महाराष्ट्र, गुजरात किंवा तामिळनाडूमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा विचार आहे. (Tesla in India)
(हेही वाचा – Delhi Assembly Election : … म्हणून मुख्यमंत्री निवडण्यास होतोय उशीर!)
नोव्हेंबरमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी नावाचा एक नवीन विभाग तयार करण्याची घोषणा केली, जो सरकारला बाहेरून सल्ला देईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी या विभागात मस्क यांची नियुक्ती केली आहे. मस्क हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सगळ्यात मोठे समर्थक मानले जातात. त्यामुळे मागच्या वर्षभरात टेस्ला कंपनीला शेअर बाजारात खूप चांगला परतावा मिळाला आहे. हा शेअर अमेरिकन शेअर बाजारांत तब्बल ८३ टक्क्यांनी वाढला आहे. तर कंपनीचं भाग भांडवल १.१२ ट्रिलियन अमेरिकन डॉलरवर पोहोचलं आहे. तर गेल्या महिन्यांत कंपनीचा हिस्सा ५९.७७% ने वाढला आहे. (Tesla in India)
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारताचा ध्वज न लावण्याच्या प्रकरणावर पाक क्रिकेट मंडळाची सारवासारव)
सध्या अमेरिकन बाजारात ६ टेस्ला इलेक्ट्रिक कार विकल्या जात आहेत. यामध्ये मॉडेल एस, मॉडेल ३, मॉडेल एक्स, मॉडेल वाय, न्यू मॉडेल वाय आणि सायबरट्रक यांचा समावेश आहे. मॉडेल ३ ही यापैकी सर्वात स्वस्त कार आहे. अमेरिकेत त्याची किंमत सुमारे २६ लाख रुपये इतकी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार ५३५ किलोमीटर धावते. हीच कार भारतात आणण्याचा कंपनीचा विचार असेल. (Tesla in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community