Tesla in India : टेस्ला कंपनी भारतात जागा पक्की करण्यासाठी एप्रिलमध्ये पाठवणार पाहणी चमू

Tesla in India : टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचं भारतात येण्याचं स्वप्न अजून कायम आहे. 

409
Tesla Share Price : ट्रम्पना इतका जवळ असूनही एलॉन मस्क यांच्या टेस्ला शेअरमध्ये इतकी घसरण कशी झाली?
  • ऋजुता लुकतुके

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत एलॉन मस्क (Elon Musk) यांची भारतात कारखाना सुरू करण्याची मनिषा अजूनही कायम आहे. आणि त्यांनी त्यादृष्टीने हालचालीही सुरू केल्याचं दिसतंय. त्यांची काल उत्पादक कंपनी टेस्लाचा कारखाना भारतात सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. या कारखान्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी ते एप्रिलच्या शेवटी शेवटी आपला एक विश्वसनीय चमू भारतात पाठवणार आहेत. टेस्ला (Tesla) कंपनीचा हा इलेक्ट्रिक कार प्रकल्प ३ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचा असेल. युके फायनान्शिअल टाईम्सने ही बातमी दिली आहे. (Tesla in India)

गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क काही प्रमाणात कमी केलं आहे. म्हणजे ज्या कंपन्या तीन वर्षांत किमान ४,१२५ कोटी रुपये भारतात उत्पादनासाठी खर्च करायला तयार आहेत, अशा कंपन्यांच्या कारवरील आयात शुल्कांत सवलत मिळणार आहे. टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क (Elon Musk) यांची आयात शुल्क कमी करण्याची मागणी होती. आणि ती पूर्ण झाल्यावर ते भारतात कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने पावलं उचलताना दिसतायत. (Tesla in India)

(हेही वाचा – Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोची ७२ तासांत दुसरी हॅट-ट्रीक)

टेस्लाचा भारतात येण्याचा निर्णय पक्का 

अलीकडेच काही कार उत्पादक कंपन्यांनी हरयाणा राज्यात आपले प्रकल्प उभारले आहेत. पण, टेस्लाची पसंती दक्षिणेतील तीन राज्यांना दिसत आहे. कारण, त्यांना या प्रकल्पातून बनवलेल्या गाड्या निर्यात करायच्या आहेत. त्यामुळे बंदर जवळ असलेली ठिकाणं ते पाहत आहेत. (Tesla in India)

खुद्द अमेरिकेत इलेक्ट्रिक कारची मागणी आता कमी होत आहे. आणि अमेरिका तसंच चीनमध्ये या कारसाठीची स्पर्धाही वाढली आहे. त्यामुळे टेस्ला कंपनी आता नवीन बाजारपेठेत आपले पाय रोवू पाहते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या गेल्यावर्षीच्या अमेरिका दौऱ्यात टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतरही टेस्लाचे उच्चपदस्थ अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करत आहेत. त्यानंतर आता टेस्लाचा भारतात येण्याचा निर्णय जवळ जवळ पक्का झाल्याचं समजतंय. पुढे जाऊन टेस्ला भारतात इलेक्ट्रिक कारसाठी लागणाऱ्या बॅटरी बनवण्याचीही शक्यता आहे. (Tesla in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.