सर्वांत लहान प्रक्षेपक SSLV-D3 चे प्रायोगिक उड्डाण यशस्वी

87
सर्वांत लहान प्रक्षेपक SSLV-D3 चे प्रायोगिक उड्डाण यशस्वी

उपग्रह वाहून नेणाऱ्या इस्रोच्या सर्वांत लहान प्रक्षेपक SSLV-D3 चे तिसरे आणि अंतिम प्रायोगिक उड्डाण शुक्रवार, (१६ ऑगस्ट) सकाळी यशस्वी झाले. यामुळे कमी वजनाचे उपग्रह वाहून नेण्यासाठी SSLV चा नियमित वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रक्षेपकाने आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या अवकाश तळावरुन सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली. नियोजन केल्याप्रमाणे १६ मिनिटांत दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले. आजच्या उड्डाणात SSLV-D3 ने EOS-08 हा १७५.५ किलोग्रॅमचा उपग्रह आणि SR-0 DEMOSAT हा २०० ग्रॅमचा उपग्रह अशा दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. EOS-08 हा विविध तरंगलांबीच्या माध्यमातून पृथ्वीची छायाचित्रे घेण्यासाठी ४७५ किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाच्या माध्यमातून समुद्र, जमीन, हिमालय यावरील विविध नैसर्गिक आपत्तींचा, घडामोडींचा अभ्यास केला जाणार आहे. यावर तीन विविध वैज्ञानिक उपकरणे असून भविष्यातील आधुनिक उपग्रहांची पायाभरणी यातून केली जाणार आहे. याचा कार्यकाळ हा एक वर्ष एवढा नियोजित केला गेला आहे.

(हेही वाचा – मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? Nana Patole यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…)

SSLV ची रचना कशी आहे ?

हा प्रक्षेपक ३४ मीटर उंच, २ मीटर व्यासाचा आणि ११९ टन वजनाचा आहे. या माध्यमातून ५०० किलोमीटर उंचीपर्यंत ५०० किलोग्रॅम वजनाचे उपग्रह पाठवता येणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा प्रक्षेपक अवघ्या सात दिवसात फक्त ७ कर्मचारी-तंत्रज्ञ-अभियंता उड्डाणासाठी सज्ज करु शकतात. यामुळे पर्यावरणीय बदल, आपत्तींवर लक्ष तसेच विज्ञान व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण डेटा पुरवला जाईल. EOS-08 मध्ये तीन अत्याधुनिक पेलोड्स आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.