Textile Museum : मुंबईतील गिरण्यांचा इतिहास लवकरच पाहता येणार जलपटावर

मुंबईची ओळख असलेल्या कापड गिरण्या बंद होऊन त्या जागांवर व्यावसायिक व निवासी इमारतींचा विकास झाला आहे.

200
Textile Museum : मुंबईतील गिरण्यांचा इतिहास लवकरच पाहता येणार जलपटावर
Textile Museum : मुंबईतील गिरण्यांचा इतिहास लवकरच पाहता येणार जलपटावर

इंडिया युनायटेड मिल काळाचौकी (India United Mill Kalachowki) येथील प्रस्तावित वस्त्रसंग्रहालयामधील (textile museum) संगीत कारंज्यावरील जलपट अर्थात मल्टीमीडिया म्युझिकल फाऊंटन शोचे (multimedia musical fountain show) काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच मुंबईच्या जडणघडणीत गिरण्यांचा आणि कामगारांच्या कशाप्रकारे संबंध आहे या त्यांच्या जीवनाचा प्रवास दाखवणाऱ्या या पहिल्या टप्प्यातील म्युझिकल शोचे (musical show) लवकरच लोकार्पण होऊन जनतेसाठी ते खुले केले जाणार आहे. या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर तलावातील पाण्याचा दर्जा राखण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज होती, हे कामही आता पुढील चार महिन्यांमध्ये पूर्ण होणार असल्याने येत्या काही महिन्यांतच या गिरण्यांचा इतिहास मुंबईकरांसह पर्यटकांना या जलपटाद्वारे पाहता येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या आणखी एका पर्यटन क्षेत्रात भर पडणार आहे. (Textile Museum)

मुंबईतील कापड गिरण्यांचा इतिहास…

मुंबईची ओळख असलेल्या कापड गिरण्या बंद होऊन त्या जागांवर व्यावसायिक व निवासी इमारतींचा विकास झाला आहे. मुंबईतील कापड गिरण्यांचा इतिहास सर्वांना माहीत होण्यासाठी महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका व राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या पुढाकाराने मुंबईतील मध्यवर्ती भागात म्हणजेच काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल येथे वस्त्रोद्योग संग्रहालय व सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे मुंबईच्या कापड गिरणीचा इतिहास, भूतकाळ व भविष्यकाळ हा पर्यटकांना पहता येईल. (Textile Museum)

मिलची सुमारे ६५ हजार चौरस मीटरची जागा हेरिटेज वास्तूत

राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाची काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल (India United Mill) क्र. २ आणि ३ मधील एकूण ६४,९४७.३४ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा ही पुरातन वास्तूंसह, पुरातन प्रसिमा म्हणून सूचित झाली आहे. त्यातील मिलच्या एकात्मिक विकासामधून महानगरपालिकेकडे ४४,००० चौ. मीटर जागा वर्ग होऊन त्या जागेवर मनोरंजन मैदान तसेच वस्त्रोद्योग संग्रहालय (Textile Museum) याचे आरक्षण टाकण्यात आले. या मनोरंजन मैदान व वस्त्रोद्योग संग्रहालयाच्या एकूण ४४,००० चौरस मीटर जागेपैकी पहिल्या टप्पा-१ मध्ये ७००० चौ. मी. जागेवर मुंबईतील गिरणगावाचे जीवन व गिरणीबाबत नवीन पिढीला माहिती होण्यासाठी वस्त्रोद्योगाची म्युरल्स तसेच तळ्याचे व परिसराचे सुशोभिकरण करुन मल्टीमिडीया संगीत कारंजे, ध्वनी व प्रकाशव्यवस्थेमार्फत चित्रीकरणातून मुंबई व गिरणी कामगारांच्या इतिहासाचे दर्शन घडवण्याचा आराखडा महापालिकेच्यावतीने बनवण्यात आला. (Textile Museum)

तळ्यात शेवाळे मोठ्याप्रमाणात जमा

या टप्पा-१ मधील तळ्याचे व परिसराचे सुशोभीकरण, म्युरल्स व बहुउद्देशी प्लाझा परिसराचे लैंडस्केपिंग अंतर्गत रस्ते, कुंपण भिंतीला जीआरसी लावून ऐतिहासिक स्वरूप देणे, वारली चित्र काढणे तसेच अग्नि प्रतिरोधक व्यवस्था करणे इ. कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच टप्पा १ अंतर्गत तळ्यावर संगीत कारंजे, ध्वनी व प्रकाशव्यवस्था करण्याचे कामही जवळपास पूर्ण होत आले आहे. परंतु तळ्यावर संगीत कारंजेप्रणाली व्यवस्थितरित्या चालण्याकरिता तळ्याच्या पाण्याचा दर्जा उत्तम ठेवणे आवश्यक आहे. परंतु या तळ्याच्या सभोवती नैसर्गिक झाडे झुडपे आहेत व आजूबाजूला दाट झाडे असल्यामुळे तळ्यात शेवाळे मोठ्याप्रमाणात जमा होते. त्यामुळे तळ्याच्या पाण्याचा दर्जा कायम ठेवण्यासाठी योग्य जलशुद्धिकरण करण्याकरिता नॅनो बबल तंत्रज्ञान (Nano Bubble Technology) असणारी प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहिती पुरातन वास्तू विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Textile Museum)

(हेही वाचा – Maharashtra Seva Sangha: महाराष्ट्र सेवा संघातर्फे ‘किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा – २०२३’चे आयोजन)

उर्वरीत ३७,०००.०० चौरस मीटरच्या जागेमध्ये वस्त्रोद्योग संग्रहालय

टप्पा-२ मध्ये उर्वरीत ३७,०००.०० चौरस मीटरच्या जागेमध्ये वस्त्रोद्योग संग्रहालय (Textile Museum), व संग्रहालय सहाय्यक व्यवस्था तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इंडिया युनायटेड (India United Mill) मिल क्र. २ व ३ काळाचौकी येथील प्रस्तावित वस्त्रोद्योग संग्रहालय (Textile Museum) जागेतील तळयामध्ये नॅनो बबल तंत्रज्ञान (Nano Bubble Technology) असणारी जल शुद्धिकरण प्रणाली बसवण्यात येणार असून यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी शक्ती स्टार प्रोडक्ट कंस्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या कंपनीची निवड झाल्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये ही प्रणाली बसवण्याचे काम पूर्ण होईल, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच संगीत कारंजांवरील जलपट पाहण्याचा या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण होऊन जनतेला याचा लाभ घेता येईल असा विश्वास अधिकाऱ्यांना वाटत आहे. (Textile Museum)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.