Thane Kalwa Hospital : त्या रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात दोन आधिकारी निलंबित तर चार आधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तपासणीचे आदेश दिल्यानंतर एक कमिटी देखील चौकशी गठित करण्यात आली होती.

185
Thane Kalwa Hospital : त्या रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात दोन आधिकारी निलंबित तर चार आधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार
Thane Kalwa Hospital : त्या रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात दोन आधिकारी निलंबित तर चार आधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी दोन आधिकारी निलंबित करण्यात आले आहे. तर चार आधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार कायम आहे. १३ ऑगस्ट २०२३ रोजी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. (Thane Kalwa Hospital )

१३ ऑगस्ट २०२३ रोजी कळवा हॉस्पिटल मधील १८ रुग्ण दगावल्यानंतर कळवा हॉस्पिटल मधील प्रशासनावरती एकच ठपका ठेवण्यात आलेला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तपासणीचे आदेश दिल्यानंतर एक चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या कमिटीच्या माध्यमातून जबाबदार डॉक्टरांकडून त्या संपूर्णपणे प्रकरणाची कारणे विचारण्यात आली होती. (Thane Kalwa Hospital )

(हेही वाचा : Corona : देशभरात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, नव्या व्हेरिएंटचे वेगळे लक्षण कोणते? जाणून घ्या…)

या कमिटीमध्ये महाराष्ट्र स्वास्थ्य विभाग आयुक्त ठाणे महानगरपालिका आयुक्त आरोग्य सेवानिर्देशक मुंबई सहाय्यक निर्देशक हे सर्व आधिकारी उपस्थित होते. या मृत्यूकांडाबद्दल हिवाळी आधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. तर आधिवेशनत विरोधी पक्षाच्या वतीने हॉस्पिटलचे अधीक्षक राजेश बरोट आणि त्यांचे मेडिसीन डिपार्टमेंट अनिरुद्ध माळगावकर व इतर दोनज्युनिअर डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

चार आधिकाऱ्यांवर निलबनाची कारवाई
या प्रकरणात दोन वरिष्ठ आधिकारी आणि दोन ज्युनिअर डॉक्टर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. अहवालात कोणावर ठपका ठेवण्यात आला नसला तरी रुग्णालयांच्या त्रुटींबाबत मात्र या चौकशी समितीन प्रशासनाच लक्ष वेधल आहे. रुग्णालयाबाबत नेमक्या काय सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत याबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.