ठाणे (Thane) शहरात शुक्रवारी, (२२ जून) रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर गावंड बाग भागात फुटबॉल टर्फवर वाऱ्यासोबत उडून आलेला लोखंडी पत्र्याने ८ मुले जखमी झाली आहेत. एकूण १७ मुले या ठिकाणी खेळत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडलीये.
ठाणे शहरात सोसाट्याचा विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. लुईसवाडी परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांवर वृक्ष पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.
(हेही वाचा – Anti Paper Leak Act: देशात पेपरफुटीविरोधी नवा कायदा लागू, नियम काय आहेत? जाणून घ्या… )
पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. अनेक भागात रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. गावंडबाग भागात फुटबॉलच्या टर्फ वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळला. यावेळी फुटबॉल खेळणारी ४ ते ५ मुले जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या मुलांवर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा पत्रा नेमका कुठून आला, याबाबतची माहिती मिळालेली नाही.
छत पडून २ जण जखमी
२१ येऊर गावातील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६५च्या छतावरील पत्र्याची शेड पडून दत्ता जनाटे (४२) आणि त्यांची ४ वर्षांची मुलगी रिना जखमी झाली आहे. या घटनेत दोघेही किरकोळ जखमी असून २ घरांचे नुकसान झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community