ऐन पावसाळ्यात ठाणेकरांवर पाणी संकट

126

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढला असतानाच दुसरीकडे ऐन पावसाळ्यातच ठाणेकरांवर पाणी संकट ओढवले आहे. भातसा नदीला पूर आला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा जमा झालेला आहे. पाणी उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी गाळ आणि कचरा अडकल्याने पाण्याचा उपसा होत नसून, यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरात कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र!)

पाण्याचा साठा करावा महापालिकेचे आवाहन 

कमी प्रमाणात पाणी पुरवठा केल्यामुळे ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. भातसा नदीच्या पिसे बंधाऱ्यावरून महापालिका पाण्याचा उपसा करते आणि त्याचा शहरात विविध भागात पुरवठा करते. शहरात दररोज विविध स्त्रोतांमार्फत ४८० दशलक्षलिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी पालिका २२० दशलक्षलिटर इतका पाणी पुरवठा करते.

ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा मागील तीन ते चार दिवसांपासून कमी प्रमाणात होत असून पाऊस व पुराचे पाणी कमी होईपर्यंत पुढील तीन ते चार दिवस पाणीपुरवठा कमी प्रमाणात होणार आहे असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.