राज्य सरकारने सुरु केलेल्या आपले सरकार २.० पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. जिल्हा परिषदेस दि. १९ सप्टेंबर २०२३ पासून ‘आपले सरकार’ पोर्टलवर (Aaple Sarkar Portal) २ हजार ३२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून २ हजार ३०१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. त्यातील २५ तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रीय स्तरावर विस्तृत अहवाल मागणीसाठी प्रलंबित आहेत. या पोर्टलद्वारे ग्रामस्थांना आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करणे तसेच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध असून ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात यश मिळाले आहे. (Thane District )
( हेही वाचा : नालासोपारामध्ये चार नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार करा; आमदार Rajan Naik यांची मागणी)
केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधार विभागामार्फत सुशासन सप्ताह अंतर्गत “प्रशासन गाव की ओर” हे अभियान जिल्ह्यात दि.१९ ते २४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत आपले सरकार पोर्टलवरील (Aaple Sarkar Portal) तक्रारी निकाली काढण्यासाठी देखील यशस्वीरित्या प्रयत्न करण्यात येणार आहे.(Thane District )
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (Rohan Ghuge) यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी २१ दिवसांच्या आत निकाली काढण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी विषेश प्रयत्न केले. आपले सरकार पोर्टलवरील (Aaple Sarkar Portal) प्राप्त तक्रारींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी साप्ताहिक सखोल आढावा घेण्यात येतो. त्यानंतर तक्रारदाराची तक्रार मांडणी व्यवस्थित न झाल्यास किंवा म्हणणे न समजल्यास तक्रारदारास दूरध्वनीवर तात्काळ संपर्क केला जातो. तक्रारींचे निवारण ठाणे जिल्हा परिषदेकडून उत्तमप्रकारे होत असल्याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अविनाश फडतरे (Avinash Phadtare) यांनी दिली.(Thane District )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community