ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार ०५ फेब्रुवारी ते सोमवार ०७ फेब्रुवारीपर्यंत रेल्वे प्रशासनाचा विशेष मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.
( हेही वाचा : आता मध्य रेल्वेचा 72 तासांचा जम्बो मेगाब्लाॅक! जाणून घ्या कोणत्या ट्रेन रद्द? )
२०५ बस फेऱ्यांचे नियोजन
रेल्वे विभागाकडून शनिवार ०५ फेब्रुवारी रोजी रात्रौ ०१ .३० वाजल्यापासून ते सोमवार ०७ फेब्रुवारी रोजी रात्रौ ०१.३० वाजेपर्यत ७२ तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी १० मिनिटांच्या अंतराने आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा स्टेशन या मार्गावर १५ मिनिटांच्या अंतराने दिवसभरात २०५ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : खुशखबर! माझगाव डॉकमध्ये दीड हजार नोकऱ्यांची संधी… )
बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेंदणी कोळीवाडा व मुंब्रा रेल्वे स्थानक येथे पर्यवेक्षक म्हणून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामासाठी संपर्क अधिकारी म्हणून सचिन दिवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी मेगाब्लॉक कालावधीत बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community