वाहतूक नियम मोडाल तर याद राखा, मिळणार ही अजब शिक्षा

191

प्रवास करताना हमखास आपण सगळे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करतो. पण आता जर का वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केलात, तर मात्र तुम्हाला अजब शिक्षा दिली जाणार आहे. जे वाहनचालक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करतील त्या वाहनचालकांना वाहतूक संदेश हातात घेऊन पंधरा मिनिटे उभे राहावे लागणार आहे. 21 एप्रिलपासून ही मोहिम प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली आहे.

म्हणून मोहिम राबवली जातेय

सिग्नल तोडणे, हेल्मेट आणि सिटबेल्ट न वापरणे अशा अनेक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्यामुळे आता नियम मोडणा-यांनाच वाहतूकीच्या नियमांची जनजागृती करण्याची शिक्षा दिली जाणार आहे. जी व्यक्ती जनजागृती करण्यास नकार देईल, त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

( हेही वाचा: पिंपरी चिंचवडमध्ये जिलेटीन काड्यांचा स्फोट घडवून उडवले एटीएम! )

पुढच्यास ठेस मागचा शहाणा

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील 18 वाहतूक उपविभागात विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांचे समुपदेशन केले जाईल. तसेच, इतरांनी चूक करु नये म्हणून, 15 मिनिटांसाठी वाहतूक शाखेने तयार केलेले संदेश फलक इतर वाहनधारकांना दाखवून रस्ता सुरक्षेच्या जनजागृती मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.