ठाणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक मार्गांमध्ये बदल

176

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कासारवडवली ते गायमुखपर्यंत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कासारवडवली सिग्नल ते नागलाबंदर सिग्नलपर्यंतच्या मार्गावरील पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे दिनांक ९ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत रात्री २३.५५ ते सकाळी ४.०० वाजेच्या दरम्यान ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरीता वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

( हेही वाचा : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशासाठी महत्त्वपूर्ण; मुंबई उच्च न्यायालय)

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे –

प्रवेश बंद –

मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग –

  • अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड़, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद –

मुंबा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग –

मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाड़ी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद –

नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग –

नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड़, अवजड वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही गर्डर टाकण्याच्या वेळी विहंग सोसायटी कट जवळून डावे बाजूस वळण सेवा रस्त्याने पुढे नागलाबंदर सिग्नल कट जवळ उजवे वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.

१) ९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत.

२) १० फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत.

३) ११ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत.

ही वाहतूक अधिसूचना वर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.