ठाणे महापालिकेत ‘या’ पदासाठी भरती; ३० जून शेवटची तारीख

ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Thane Mahanagarpalika recruitment 2022 ) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय तज्ज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे.

या पदासाठी भरती

 • वैद्यकीय तज्ज्ञ ( Medical Specialist) एकूण जागा 45

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

 • वैद्यकीय तज्ज्ञ ( Medical Specialist)
 • या पदांसाठी अर्ज करु इच्छिणा-या उमेदवारांनी कोणत्याही MBBS पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
 • तसेच उमेदवारांनी पदवीसह संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.

( हेही वाचा: NH8, NH13; असे क्रमांक राष्ट्रीय महामार्गांना का दिले जातात ? )

ही कागदपत्रे आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-400 602.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here