ठाणे शहरातील पाणी पुरवठा बुधवारी बंद!

71

पावसाळ्यापूर्वी दैनंदिन देखभाल व दुरूस्तीच्या आवश्यक कामांसाठी बुधवार १५ जून रोजी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे महापालिका टप्प्या टप्प्याने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करत असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

ठाणे शहरातील पाणी पुरवठा बंद 

बुधवार १५ जून रोजी सकाळी ९ ते गुरुवार १६ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागांचा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद राहील.

( हेही वाचा : Online Ration Card: ऑनलाइन अर्ज करा, रेशन कार्ड थेट येईल घरा!)

समतानगर, ऋतूपार्क, सिद्धेश्वर, ईटरनिटी, जॉन्सन जेल, रेतीबंदर, उथळसर, साकेत, कळव्याचा व मुंब्रा परिसराच्या काही भागात बुधवारी रात्री ९ ते गुरूवारी सकाळी ९ या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहील. या पाणी पुरवठा बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस ठाणे शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.