नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेत काम करण्याची सुवर्णसंधी असून लवकरच काही जागांची भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख २३ नोव्हेंबर २०२२ आहे.
( हेही वाचा : BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! रोहित नाही, आता ‘या’ खेळाडूला करा कर्णधार; माजी क्रिकेटपटूचे स्पष्ट मत )
नियम व अटी जाणून घ्या…
- पद – परिचारिका (नर्स)
- एकूण जागा – ४९
- शैक्षणिक पात्रता व अनुभव – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी बीएस्सी नर्सिंग पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
- इतका पगार मिळणार – परिचारिका ३० हजार रुपये
- कागदपत्रे आवश्यक
- बायोडेटा
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणित प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- ओळखपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मुलाखतीची तारीख – २३ नोव्हेंबर २०२२
Join Our WhatsApp Community