ठाणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना होणार निवड, मिळेल ६० हजारांपर्यंत पगार

ठाणे महानगरपालिकेअंतर्गत वैद्यकिय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२२ आहे.

( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाला एका दिवसात अतिरिक्त ३ लाखांचा फायदा! काय आहे कारण? )

अटी व नियम जाणून घ्या…

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • पदसंख्या – ४७ जागा
 • नोकरी ठिकाण – ठाणे
 • वयोमर्यादा – वैद्यकीय अधिकारी – ७० वर्ष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ६५ वर्ष
 • अर्ज शुल्क –
  खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १५० रुपये
  राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १०० रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता

उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवारस धर्मवीर नगर -२, ठाणे (प.) ४००६०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०२२

 • अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
 • पदाचे नाव – पदसंख्या
 • वैद्यकीय अधिकारी – २१ पदे
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २६ पदे

शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी – MBBS with MCI registration/MMC registration
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc. With D.M.L.T.

वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी – ६० हजार रुपये
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७ हजार रुपये

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here