ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयातील Chatrapati Shivaji Maharaj Hospital: घटना शुक्रवारीच पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी १७ रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली आहे. त्यांमुळे ठाणे रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे .
दरम्यान, शुक्रवारी ज्या रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नव्हते, रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नव्हते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयात उपचार न मिळाल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.रुग्णाकडे नातेवाईकांनाही दिले जाऊ जात नव्हते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर गोळ्या, जेवण याकडे पूर्ण दुर्लक्ष होत होते. नातेवाईक काही म्हटले तर त्यांना बाहेर हाकलले जात होते.
अपुरी डॉक्टर संख्या आणि वैद्यकीय यंत्रणेचा फटका
अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकाच रात्री १७ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. यातील १३ रुग्ण हे आयसीयू मधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते. दरम्यान, काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने आणि काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – Independence Day: ७७ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज)
सिव्हील हॉस्पिटल बंदचा फटका
दरम्यान, ठाण्यातील सिव्हील रुग्णालय बंद असल्याने सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत आहेत. तर शहापूर पासून ते पालघर पर्यंत चे अनेक रुग्ण याठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात. त्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शुक्रवारी १० तारखेला एकच दिवशी ५ जणांचा मृत्यू झाला होता. असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.