कोरोना काळात अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या, व्यवसाय गमावले आहेत. अशा तरूणांसाठी रोजगार मेळाव्याच्या रूपात सुवर्णसंधी निर्माण करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 10 डिसेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत http://ncs.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जॉबसिकर म्हणून नोंदणी करा
उमेदवारांनी www.ncs.gov.in या पोर्टलवर नोंदणी केली नसल्यास जॉबसिकर म्हणून नोंदणी करावी. नंतर जॉब फेअर व इव्हेंट टॅब मधील ऑनलाईन लिंकवर क्लिक करुन उपलब्ध असलेल्या रिक्तपदाची माहिती पाहून पर्याय निवडावा. त्यावर आपला सहभाग नोंदवावा, बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे. अधिक माहिती करीता कार्यालयाच्या 022-25428300 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
( हेही वाचा : अवकाशात झेपावणार ‘आदित्य’! )
बेराजगारीत वाढ
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे आपल्या नोकऱ्या गमावल्या, तर व्यवसायही ठप्प झाले. वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे अनेकजण रोजगारासाठी बाहेर पडू शकले नाहीत. यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा सर्वांना या रोजगार मेळाव्यामुळे लाभ होणार आहे.
Join Our WhatsApp Community