ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. १६ आणि १७ डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. (Thane Power Block)
मध्य रेल्वे (Central Railway) कडून यासंदर्भात महत्वाची बातमी देण्यात आली आहे. मध्य रेल्वे ठाणे स्थानकाच्या पाच मीटर रुंद FOB(कल्याण साइडला) साठी गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक चालवणार आहे. शनिवार आणि रविवार रात्रीच्या वेळी ब्लॉक चालवला जाणार आहे. रात्री १०.१० ते पहाटे ३.४० या कालावधीत सहाव्या लाईनवर, अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर ५.३० तास अप जलद लाईनवर रात्री १२.१० ते पहाटे २.४० असा अडीच तास हा ब्लॉक असेल. (Thane Power Block)
कुठे असेल ब्लॉक
अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्स (Trans : ठाणे (प्लॅटफॉर्मसह) ते कोपर खैरणे(क्रॉसओव्हर वगळता)
६ वी लाइन : दिवा (क्रॉसओवर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओवर्स वगळता)
५ वी लाइन : मुलुंड (क्रॉसओवर्स वगळता) ते दिवा (क्रॉसओवर्स वगळता)
अप जलद लाइन : दिवा (क्रॉसओवर्स वगळता)ते मुलुंड (क्रॉसओवर्स वगळता)
तर अप मेल गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. अप सहाव्या मार्गावर धावणाऱ्या अनेक मेल कल्याण,दिवा येथून अप जलद लाईनवर वळविल्याजाणार आहे. तसेच त्यांच्या वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहचतील. असेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा : Deepak Kesarkar : शाळा व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक)
कधी असेल शेवटची लोकल
या कालावधीत उपनगरीय’गाड्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर रद्द असतील.
- डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल ठाणे येथून ९.५२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री १०.४६ वाजता पोहोचेल.
- अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वाशी येथून ९.२४ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ९.५३ वाजता पोहोचेल.
- अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून ८.५१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ९.४६ वाजता पोहोचेल. ब्लॉक संपल्यानंतर नियोजित वेळेनुसार लोकल धावतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community