नुकत्याच पार पडलेल्या संसदेत अधिवेशन काळात खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा (Thane Railway Station) विकास कामांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे (Mp rajan vichare) यांच्यासोबत मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची विस्तृत चर्चा व पाहणी करण्यासाठी वेळ मागितली होती. त्याप्रमाणे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी आयोजित केलेली होती. या पाहणी दौऱ्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकातील दररोज प्रवास करणाऱ्या आठ लाख प्रवाशांसाठी पर्यायी फलाटांची व्यवस्था कशी करता येईल याबाबत चर्चा झाली. (Rajan Vichare)
मेंटल हॉस्पिटलच्या जागेवर होणारे नवीन रेल्वे स्थानक
ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या रेल्वे स्थानकाचे काम मार्गी लागल्यास स्थानकातील प्रवाशांचा अतिरिक्त पडणारा भार कमी होऊ शकेल. यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकातील सुरू झालेल्या नवीन स्टेशन परिचलन क्षेत्रातील विकास कामांची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्टेशनकडे जाणारे ३ मार्ग विकसित करण्याचे काम सुरु आहे. पहिला मार्ग ज्ञानसाधना कॉलेजकडून स्टेशनकडे जाणारा, दुसरा मार्ग धर्मवीर नगराकडून स्टेशनकडे जाणारा, तिसरा मार्ग मुलुंड चेकनाका मॉडेला मिल कडून स्टेशनकडे जाणारा. या तीन मार्गिकांचे काम सुरु असून स्टेशन डेक, पार्किंग, व कंपाऊंड वॉल चे काम देखील तितक्याच गतीने सुरु आहे. ३०% काम पूर्ण झालेले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. (Rajan Vichare)
(हेही वाचा : Air Pollution : दिल्लीची हवा पुन्हा प्रदूषित; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमुळे धोका आणखी वाढणार)
मुंबई व कल्याण दिशेस होणारे नवीन पादचारी पूल २६ जानेवारी पर्यंत खुले होणार
खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने रेल्वे प्रवाशांना अपुरे पडणाऱ्या पादचारी पुलाची संख्या लक्षात घेता दोन नवीन पादचारी पूल महापालिकेकडून मंजूर करून रेल्वे कडून बांधून घेतले आहे. याचीही पाहणी करण्यात आली असून सदर दोन पादचारी पूल २६ जानेवारी पर्यंत खुले करून देणार असे रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना आश्वासन दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community