ठाणेकरांनो, कोपरी रेल्वे ब्रिज डांबरीकरणाच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

94

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे वाहतूक विभाग अंतर्गत कोपरी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत कोपरी रेल्वे ब्रिजवर डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असून मुंबई-नाशिक वाहिनीवर २५ जानेवारी २०२३ ला रात्री ११.०० ते २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत कोपरी रेल्वे ब्रिजवरून नाशिक मुंबई व मुंबई नाशिक वाहिनीवरील सुरु असलेली वाहतूक पूर्णपणे बंद ठेऊन पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

ठाणे शहर अंतर्गत परिसरातून राज्यांतर्गत व बाहेरील राज्यातून मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर जड- अवजड व हलक्या वाहनांची मोठया प्रमाणात ये-जा होत असते. ठाणेकडून मुंबईकडे व मुंबईकडून ठाणेकडे जाणा-या सर्व प्रकारच्या हलक्या व जड- अवजड वाहनांना प्रवेश बंद करावा लागणार आहे. त्याकरता वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे आवश्यक असल्याने तसेच, ठाणे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.

जड- अवजड वाहनांकरता

प्रवेश बंद – १) नाशिक मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पुर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणा-या जड -अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग – सदरची वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक- पारसिक रेती बंदर- मुंब्रा बायपास- – शिळफाटा उजवे वळण घेऊन महापे मार्गे- रबाळे ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गानि इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – २) घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणा-या जड- अवजड वाहनांना माजीवाडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास आणि गोल्डन क्रॉस माजीवाडा ब्रिजखाली प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – सदरची वाहने तत्वज्ञान सिग्नल पुढे माजीवाड़ा ब्रिजवरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक- पारसिक रेती बंदर-मुंब्रा बायपास-शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन महापेमार्गे रबाळे ऐरोली ब्रिजमार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

( हेही वाचा: ग्राहकांसाठी झोमॅटोने पुन्हा सुरु केली ‘ही’ जुनी ऑफर )

हलक्या वाहनांकरीता

प्रवेश बंद – नाशिक व घोडबंदर रोडने तसेच ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणा-या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना तीन हात नाका ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग – १) नाशिककडून मुंबई कडे जाणारी हलकी वाहने साकेत कट डावीकडे वळण घेऊन महालक्ष्मी मंदिर – साकेत रोड-किक नाका- डावीकडे वळण घेऊन शिवाजी चौक कळवा-विटावा- ऐरोली मार्गे-ऐरोली ब्रिज-ऐरोलो बिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग – २) ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने जी. पी. ओ. ऑफिस- ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोड-आर. टी.ओ. कार्यालय समोरून किक नाका-कळवा ब्रिज-शिवाजी चौक कळवा-विटावा- ऐरोली मार्गे- ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग – (३) घोडबंदर रोड व ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेऊन एल.बी.एस. रोडने मॉडेला चेकनाकामार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग – ४) घोडबंदर रोड व ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने तीन हात नाका-तुळजा भवानी मंदिर – कट-सर्व्हिस रोडने कोपरी ब्रिज-कोपरी सर्कल- बारा बंगला फॉरेस्ट ऑफिस- माँ बाल निकेतन स्कुल- आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईकडे इछित स्थळी जातील.

ही वाहतूक अधिसूचना मुंबई-नाशिक वाहिनीवर दि. २५ जानेवारी २०२३ रोजी रात्री २३.०० ते दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. पर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डाॅक्टर विनयकुमार राठोड यांनी एक प्रसिध्दी पत्रकेद्वारे कळवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.