ठाणे शहरातील राबोडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत 17 डिसेंबर रोजी मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपुलाच्या खाली हॉलीक्रॉस के व्हिला, ठाणे येथील जुन्या नाल्यावरील पूल पाडून नवीन पुलाचे काम करण्यात येणार आहे. त्याकरता परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी सदर रस्त्यावरील वाहतूकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे:
प्रवेश बंद :- जी. पी. ओ. कडून के व्हिला मार्गे मिनाताई ठाकरे चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जी. पी. ओ. येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने जी. पी. ओ. सिव्हील हॉस्पिटल कॉर्नर उथळसर नाका मार्गे मिनाताई ठाकरे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- मिनाताई ठाकरे चौक कडून के. व्हिला मार्गे जी. पी. ओ. कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मिनाताई ठाकरे चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने मिनाताई ठाकरे चौक, उथळसर नाका, सिव्हील हॉस्पिटल कॉर्नर मार्गे इच्छित स्थळी जातील.
( हेही वाचा: दहावी- बारावीचे शिक्षण महागणार; परीक्षा शुल्कात होणार ‘एवढी’ वाढ )
सदरची वाहतूक अधिसूचना ही दि. 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वा. पासून सदर काम पूर्ण होईपर्यंत अमलात राहील, सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.
Join Our WhatsApp Community