ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या महिला वाहक स्वप्नगंधा घाटे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ASRTU नवी दिल्ली, या संस्थेने त्यांचा सन्मान केला. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी (Kiran Bedi) यांच्या हस्ते स्वप्नगंधा घाटे (Swapnagandha Ghate) यांना सन्मानित करण्यात आले.
(हेही वाचा – DCM Eknath Shinde : लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन)
महिला वाहक स्वप्नगंधा स्वप्नील घाटे (Swapnagandha Ghate) वय 38, वाहक क्रमांक 2006 या सन 2020 पासून वाहन वाहक या पदावर ठाणे (Thane) परिवहन सेवेत कार्यरत आहेत. ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाने नियुक्त केलेले कत्रांटदार मे. अपुर्वा महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या परिवहन सेवेत काम करत आहेत. स्वप्नगंधा घाटे यांनी आजपर्यंत अत्यंत प्रामाणिक व निष्कलंक सेवा ठाणेकर नागरिकांना देत आहेत.
स्वप्नगंधा घाटे (Swapnagandha Ghate) यांच्या कार्यसन्मानामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे व ठाणे (Thane) परिवहन सेवेचे नाव देशपातळीवर पोहचले आहे. स्वप्नगंधा घाटे यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील कौतुक करून अभिनंदन केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community