Thane Water Cut : ठाण्यातील काही भागात बुधवारी टप्पाटप्प्याने होणार पाणीपुरवठा

94
Thane Water Cut : ठाण्यातील काही भागात बुधवारी टप्पाटप्प्याने होणार पाणीपुरवठा
Thane Water Cut : ठाण्यातील काही भागात बुधवारी टप्पाटप्प्याने होणार पाणीपुरवठा

ठाणे महानगरपालिकेला (Thane Municipal Corporation) मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक २८/०८/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वा. ते गुरूवार सकाळी ०९.०० वा. पर्यत असा २४ तासांचा शटडाऊन घेवून त्यांच्या योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे महत्त्वाचे कामाकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्पाटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. (Thane Water Cut)

(हेही वाचा – Dahihandi 2024 : विक्रोळीत जय जवान पथकाचे ९ थर; एकावर एक ४ एक्के)

परिणामी घोडबंदर रोड, पवारनगर, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, कासारवडवली, विजयनगरी, विजय पार्क, राममंदिर रोड, मानपाडा, टिकूजीनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, यशस्वीनगर, मनोरमानगर, माजिवडा, कापूरबावडी, सोहम इस्टेट, उन्नती, सुरकुरपाडा, जयभवानी नगर आणि मुंब्रा रेतीबंदर इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा बुधवार दि. २८/०८/२०२४ सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यत बंद राहील व समतानगर, ऋतूपार्क, सिध्देश्वर, आकृती, दोस्ती, विवियाना मॉल, वर्तकनगर, रुस्तमजी, नेहरूनगर, किसननगर-2, इटनिर्टी, जॉन्सन, जेल, साकेत इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवार रोजी रात्री ०९.०० ते गुरूवार सकाळी ०९.०० वा. पर्यत बंद (Thane Shutdown of water supply) राहील, अशा रितीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. (Thane Water Cut)

(हेही वाचा – Women’s T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांना ‘या’ तारखेला भिडणार)

सदर शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. (Thane Water Cut)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.