ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चिराग नगर येथील लोढा आयटी पार्क जवळील कल्व्हर्टच्या रूंदीकरणाच्या कामामुळे 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06.00 ते 15 मे 2023 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत लोढा आयटी पार्क व विवियाना मॉल मागील गेटच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून, या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
( हेही वाचा: पोलीस शिपाई भरतीच्या मैदानी चाचणीनिमित्त ठाण्यातील वाहतूक मार्गांत बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग )
वाहतूकीत बदल पुढीलप्रमाणे
प्रवेश बंद – (1) लोढा आयटी पार्क व विवियाना मॉल मागील गेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टी.सी.एस. येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने टी.सी.एस, वसंत लॉन्स, हरदास नगर, ज्युपिटर हॉस्पिटल, विवियाना मॉल सर्व्हिस रोड, उत्सव हॉटेल मार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद – 2) टी.सी.एस. व पोखरण रोड नं.02 कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोढा आयटी पार्क येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने उत्सव हॉटेल, विवियाना मॉल सर्व्हिस रोड, ज्युपिटर हॉस्पिटल, हरदास नगर, वसंत लॉन्स मार्गे इच्छीत स्थळी जातील.
ही वाहतूक अधिसूचना 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06.00 ते 15 मे 2023 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. ही अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळवले आहे.
Join Our WhatsApp Community