उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ महिलेची पटली ओळख 

124
उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ महिलेची पटली ओळख 
उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ महिलेची पटली ओळख 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रायलयातील कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना (२६ सप्टेंबर) घडली होती. संबंधित महिला ही भारतीय पक्षाची कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली आहे. तर त्या महिलेला पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही महिला मनोरुग्ण (Female psychopath) असल्याचा दावाही केला जात आहे. 

ही महिला देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, या महिलेने उद्विग्नतेतून हल्ला केलाय का? हे जाणून घेऊ. तिने कशामुळे हे पाऊल उचलले हे समजून घेऊ…

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला कोण आहे? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलं आहे. धनश्री सहस्त्रबुद्धे (Dhanashri Sahastrabuddha) असं महिलेचं नाव असून ही महिला घरी एकटीच राहते. आई-वडिल काही वर्षापुर्वीच मरण पावले आहेत. बहीण लग्न करून सासरी गेली आहे. सदर महिलेनं गुरुवारच्या (२६ सप्टेंबर) रात्री इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा तोडला. सीसीटीव्ही मार्फत महिलेची ओळख पटली आहे. फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला दादरमधील एका सोसायटीतील राहिवासी आहे. दादरमधील सोसायटीत देखील ती चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आहे. सोसायटीमध्ये देखील ती लोकांच्या दारावर झाडू मारत फिरत असते. तिच्या अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमांतून समोर येत आहेत. 

(हेही वाचा – कसबा मतदारसंघातून भाजपाने Kunal Tilak यांना उमेदवारी देण्याची मागणी)

महिलेवर सोसायटीतही अनेक गुन्हे दाखल

दुसरीकडे, स्थानिकांनी संबंधित महिलेचे मानसिक संतुलन बरोबर नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, संबंधित महिलेचे मानसिक आरोग्य बरोबर नाही. तिच्या विरोधात सोसायटीमध्ये ही अनेक तक्रारी दाखल आहेत. तिच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. तिला मोकळे सोडले तर ती समाजासाठी घातक आहे. ती सोसायटीत एकटीच राहते. तिला कंटाळून तिचे कुटुंबीयही तिला सोडून गेलेत. तिने तिच्या वृद्ध वडिलांनाही त्रास दिला होता. त्यामुळे त्यांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तिला समुपदेशन किंवा मानसिक उपचारांची गरज आहे. सदर महिला उच्चशिक्षित आहे. पण आता काही गोष्टींना कारण नसते. आजवर तिने येथे अनेकदा धुडगूस घातला. आता तिने थेट मंत्रालयात (Mantralay) जाऊन तोडफोड केली आहे. तिच्यावर योग्य ती कारवाई करा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी  केली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.