चुलत भावाच्या कृत्याला कंटाळून १४ वर्षांच्या बहिणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

146
मागील वर्षभरापासून चुलत भावाच्या शारीरिक छळाला कंटाळून १४ वर्षांच्या बहिणीने राहत्या घरात गळफास लावून स्वतःचे आयुष्य संपविल्याची घटना कुर्ला पश्चिम येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी चुलत भावाविरुद्ध विनयभंग, बाल लैंगिक संरक्षण कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्ला पश्चिम बैलबाजार परिसरात १० मार्च रोजी १४ वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा उलगडा रविवारी झाला, या मुलीच्या शाळेतील बॅगेत मिळालेल्या वहीत मुलीने चुलत भावाचे कृत्य लिहून ठेवले होते, घराजवळ राहणारा तिचा २१ वर्षांचा चुलत भाऊ वर्षभरापासून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होता.
त्याच्या या कृत्याला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे तिने वहीत नमूद केले होते, विनोबा भावे नगर पोलिसांनी वही ताब्यात घेऊन चुलत भावाविरुद्ध चुलत भावाविरुद्ध विनयभंग, बाल लैंगिंक संरक्षण कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.