-
प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे. विद्यान भवनात हा उद्घाटन सोहळा होणार आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी या काळात होत आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार असल्याने मंचावरील मान्यवरांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. साहित्य संमेलनाच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मावळते संमेलनाध्यक्ष नियोजित संमेलनाध्यक्षांना सूत्र सोपवत असतात. साहित्य संमेलनाच्या ९७ वर्षांच्या इतिहासात अपवाद वगळता ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात आली आहे. परंतु, यंदा पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) सुरक्षेच्या कारणास्तव या परंपरेला फाटा दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, १९५४ मध्ये दिल्ली येथे शेवटचे संमेलन प्रसिद्ध कोशकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले होते.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी बांगलादेशबाबत भारताला दिला ‘फ्रि हॅन्ड’; म्हणाले, काय करायचं ते…)
संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर
ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी कट्टा, मुलाखती अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी साहित्य संमेलन रंगणार आहे. अभिजात मराठी भाषेचा जागरही संमेलनात होईल.
तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखकांचाही समावेश आहे. समारोप रविवारी (दि.२३) सायंकाळी साडेचार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, मराठी भाषामंत्री उदय सामंत, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित राहतील.
(हेही वाचा – Inflation Rate : जानेवारीत महागाई दरात घसरण, भाजीपाल्याचे दरही उतरले)
संमेलनात २३ फेब्रुवारीला होणारे कार्यक्रम
असे घडलो आम्ही (सकाळी १०)
परिसंवाद – विषय – सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य (दुपारी १२)
परिसंवाद – विषय – नाते दिल्लीशी मराठीचे (दुपारी २:३०)
संमेलनात रविवारी (दि. २३) होणारे कार्यक्रम (यशवंतराव चव्हाण सभा मंडप)
परिसंवाद – विषय – अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत (सकाळी १०)
परिसंवाद – विषय – कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता (दुपारी १०)
महात्मा जोतिराव फुले सभामंडपातही विविध कार्यक्रम रंगणार आहेत. शनिवारी (दि. २२) कवी कट्टा सकाळी ९ ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत आयोजित केला आहे. रविवारी (दि.२३) कवी कट्टा सकाळी ९:३० ते दुपारी १ आणि दुपारी १ ते २ या वेळेत होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community