धक्कादायक! प्रतिमा खराब होऊ नये, म्हणून लपवले जातायत कोरोना मृतांचे आकडे

156

आपल्या देशाची जागतिक पातळीवर बदनामी आणि प्रतिमा खराब होऊ नये, म्हणून अनेक देश आपल्या देशातील कोरोना मृतांची संख्या लपवत असल्याचे, उघड झाले आहे. जगभरात 2019 पासून कोरोनाचा फैलाव झाला. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या मृतांची सरकारद्वारे जाहीर होणा-या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षातील संख्या दोन ते चार पटीने जास्त आहे, असा दावा ब्रिटनमधील विज्ञानविषयक नेचर या प्रतिष्ठित नियतकालिकात संशोधनाच्या आधारे करण्यात आला आहे.

मृतांची संख्या अधिक

सरकारी आकड्यांनुसार, कोरोनाच्या जागतिक साथीला सुरुवात झाल्यापासून, 55 लाखांहून जास्त लोकांचा जीव गेला आहे. नेचरमध्ये प्रकाशित एका नव्या संशोधनानुसार मृतांची खरी संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. लंडनमधील ‘द इकोनाॅमिस्ट’ मासिकाद्वारे मृतांच्या मोजमापासाठी जी प्रणाली वापरली जाते, त्याच्याच मदतीने नेचरमधील प्रसिद्ध झालेल्या या संदर्भातील अहवाल तयार केला आहे. एका यंत्राच्या आधारे निश्चित केलेली आकडेवारी त्याच्या केंद्रस्थानी आहे.

( हेही वाचा: नथुराम गोडसेंची भूमिका आव्हानात्मक! अमोल कोल्हेंची कबुली )

आरोग्य संघटना जारी करणार आकडेवारी 

कोरोनाबाधितांची माहिती देण्याच्या पद्धतींची या संशोधनात नोंद घेण्यात आली आहे. उदाहरणार्थ नेंदरलॅंडमध्ये साथीच्या प्रारंभीच्या काळात जे कोरोना संक्रमित रुग्णालयात भरती झाले आहेत आणि तेथे त्यांचा मृत्यू झाला, तरच त्यांना कोरोनामृत मानले गेले होते. तर बेल्जिअममध्ये हिवळ्यामुळे मरण पावलेल्या लोकांचाही चाचणीविना कोरोनामृतांमध्ये समावेश केला होता. नेचरमध्ये प्रकाशित अहवालानुसार, जागतिक आरोग्य संघटनेकडून लवकरच कोरोना मृतांची आकडेवारी जाहीर होणार आहे. कोरोना मृतांची खरी आकडेवारी जाणून घेण्यासाठी संघटनेने तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्या आकडेवारीची पाच वर्षांपूर्वीच्या मृतांच्या संख्येशी तुलना करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.