Municipal license : शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर

डॉ. शिंदे यांनी उपआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात परवाना सुधारणा समिती नेमली आहे.

226
Municipal license : शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर
Municipal license : शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर

मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या विविध अनुज्ञापनांची (परवाना) प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या समितीचे सदस्य तसेच मुंबईतील विविध व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात मंगळवारी २९ ऑगस्ट २०२३ सायंकाळी बैठक पार पडली. यामध्ये कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेच्या बाबतीत शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर सुलभ आणि जलद कार्यपद्धती अंमलात आणण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

New Project 84 2

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिक तसेच व्यवसायिकांना त्यांच्या विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी तसेच प्रयोजनांसाठी अनुज्ञापन (परवाना) दिले जातात. त्यामुळे नागरिकांना महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये व्यवसाय करता येतो. परंतु, परवाना देण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात, परवाने विहित मुदतीत मिळत नाहीत, अशा आशयाच्या तक्रारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे, आयकर विभाग तसेच पासपोर्ट विभागामध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या धर्तीवर महानगरपालिकेतील परवाना देण्याची प्रक्रिया सुलभ आणि अद्ययावत व्हावी, यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी उपआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात परवाना सुधारणा समिती नेमली आहे. याच समितीच्या वतीने विविध व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

New Project 85 2

(हेही वाचा – Ganeshotsav : कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी ‘लकी ड्रॉ ‘)

अनुज्ञापने देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेच्या बाबतीत शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर सुलभ आणि जलद कार्यपद्धती अंमलात आणली जाईल. विविध व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांचा विचार करून अनुज्ञापने देण्याची पद्धत सुलभ आणि पारदर्शक करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी यावेळी दिले. विविध व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधीने आपले म्हणणे मांडले. अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य ती भूमिका प्रशासनातर्फे घेतली जाईल असे आश्वासित केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.