मुंबईतील माझगावची हवा दिल्लीपेक्षाही वाईट; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवेची गुणवत्ता

180

देशाची राजधानी दिल्लीची हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे आपल्याला माहिती आहे. पण मुंबईतील माझगावची हवा ही दिल्लीपेक्षाही अत्यंत वाईट असल्याचे समोर आले आहे. माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 324 नोंदवला गेल्याने तेथील हवा सर्वाधीक दूषित असल्याचे चित्र आहे. मालाड परिसरातही अतिशय वाईट हवेचा दर्जा असून तेथील एक्यूआय 317 आहे.

‘सफर’ च्या हवा गुणवत्ता प्रणालीनुसार, दिल्लीचा एक्यूआय 206 असा वाईट आहे. त्या तुलनेत संपूर्ण मुंबई शहराची हवा मध्यम दर्जाची असून 186 एक्यूआय नोंदला गेला आहे. या तुलनेत माझगावची हवा सर्वाधिक दूषित आहे. दरम्यान, मुंबईतील माझगाव आणि मालाड परिसर सोडल्यास इतर अन्य परिसरात वाईट हवेची नोंद झालेली नाही.

( हेही वाचा: काय सांगता? सरकार देणार घरपोच आंबे ‘या’ संकेतस्थळावरून करा ऑर्डर! )

शहरातील हवेचा दर्जा

  • माझगाव ( 324) अतिशय वाईट
  • मालाड (317) अतिशय वाईट
  • अंधेरी (183) मध्यम
  • मुंबई (180) मध्यम
  • कुलाबा (159) मध्यम
  • बोरिवली (135) मध्यम
  • बीकेसी (115) मध्यम
  • चेंबूर (115 )मध्यम
  • भांडुप (112) मध्यम
  • नवी मुंबई (90) उत्तम- समाधानकारक
  • वरळी (59 )उत्तम -समाधानकारक

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.