बापरे…सौराष्ट्रातील वाळवंटातील वाळू मुंबई आणि नाशकात…

88

उत्तर कोकणात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असताना रविवारी सकाळीच मुंबईभरातील हवेत शेजाराच्या गुजरातेतील सौराष्ट्रातून आलेली वाळवंटातील वाळू मिसळली. रविवारची आरामात उठलेल्या मुंबईकरांना काही कळायच्या आतच संपूर्ण मुंबई आणि नजीकच्या परिसराची हवा बिघडली. दुपारपर्यंत वाळूच्या कणांनी नाशिक गाठले.

दिवसभर मुंबईकरांनी धूसर दिसणार..

ही परिस्थिती आज दिवसभर राहणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मात्र वाळूचे कण जास्त नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंत सरकार यांनी दिला. उत्तरेतील थंडी राज्यात वाहून आणणारे पश्चिमी प्रकोप (वाऱ्याची वरच्या थरातील स्थिती) या स्थितीने किनाऱ्यानजीकच्या भागात प्रवेश करताना सौराष्ट्रातील वाळवंटातील वाळूचे कणही सोबत आणल्याने हवेचा दर्जा बिघडल्याची माहिती सरकार यांनी दिली. आज दृश्यमानता कमी राहील, असेही ते म्हणाले. उद्या सोमवारी वातावरण पूर्ववत होऊन आकाश ढगाळ राहील, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.