लोकमान्य टिळक वैद्यकीय रुग्णालय ग्राहक सहकारी संस्थेची वार्षिक सभा पार पडली

लोकमान्य टिळक वैद्यकिय महाविद्यालय आणि रूग्णालय ग्राहक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबरला अतिशय उत्साहात व आनंदमय वातारवरणात संपन्न झाली. सभेची सुरूवात सभासदांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून अध्यक्ष वर्षा माळी यांनी संस्था, सभासद आणि संचालक मंडळ यांचे संस्थेशी असणारे घनिष्ठ नाते, सभासदाचे संस्थेविषयी असणारे प्रेम भावना व्यक्त केल्या.

(हेही वाचा अखेर सर्व ३६ जिल्ह्यांना मिळाले पालकमंत्री, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे?)

संचालक मंडळाच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या

संस्थेच्या सभासदांनी या सभेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत संचालक मंडळाच्या या अहवाल वर्षात केलेल्या कार्याचा गौरव केला व आम्ही आपल्यासाठी खंबीरपणे उभे आहोत असे मत व्यक्त केले, तसेच त्यांनी संचालक मंडळाच्या पुढील वाटचालीत खूप-खूप शुभेच्छा दिल्या. सभेचे सर्व विषयांवरील चर्चा खेळीमेळीत पार पडली. संचालक मंडळाने संस्थेत काम करत असणा-या कर्मचारी वर्गाची दखल घेत त्यांचा गुणगौरव केला. त्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षा वर्षा माळी यांनी सभेस उपस्थित सभासदाचे अभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here