कोकण विभागात सरासरी 1.6 मि.मी. पावसाची नोंद

कोकण विभागात सरासरी 1.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्हयात 4.4मि.मी. झाली आहे. कोकण विभागात आत्तापर्यंत एकूण 76.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे.

  • ठाणे-0.0 मि.मी.,
  • पालघर-0.8मि.मी,
  • रायगड-0.1 मि.मी.,
  • रत्नागिरी-4.4 मि.मी.,
  • सिंधुदुर्ग-1.0मि.मी.

( हेही वाचा: शिर्डीत धावणार पहिली खासगी ट्रेन )

मराठवाड्याची निराशाच

आतापर्यंत मान्सून निम्म्या महाराष्ट्रात दाखल झाला असला, तरी पूर्ण क्षमतेने सक्रिय झालेला नाही. कोकणातून दाखल झालेला मान्सून मुंबई, उपनगर आणि उत्तर महाराष्ट्रात बरसला असला तरी मराठवाड्याकडे त्याने पाठच फिरवली आहे. मराठवाड्यात 14 जूनच्या सरासरीप्रमाणे केवळ 6.37 टक्के पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यांना तर आणखीन हंगामपूर्व पावसाची प्रतीक्षा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here