‘गांजा कंपनी’ अमेझॉनवर कारवाई करा! ट्विटर ट्रेंड सुरु

ई कॉमर्स कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेझॉन कंपनीने गांजाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस कारवाई करत आहेत. मात्र आता अमेझॉनला चक्क ‘गांजा कंपनी’ म्हणून सोशल मीडियातून हिणवले जाऊ लागले आहे. ‘ban ganja company’ हा ट्रेंड ट्विटरवर जोरदार सुरु झाला आहे. त्यावर तब्बल ४ हजार जणांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय आहे प्रकरण? 

नुकतेच अमेझॉन कंपनीने गांजाची विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत अमेझॉन कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच या कंपनीची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान याला कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर (सीएआयटी) या विक्रेत्यांच्या संघटनेने तीव्र विरोध केला आहे. असा प्रकारे ई कॉमर्स कंपन्यांनी आधीच पारंपरिक दुकानकारांच्या पोटावर पाय आणला आहे. आता व्यापाराच्या नावाखाली समाजद्रोही कृत्य करत आहेत. तरुणांना अमली पदार्थांची विक्री करून त्यांना व्यसनाधीन बनवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे अमेझॉनवर बंदी आणावी, अशी मागणी या संस्थेने केली आहे, या संस्थेची ही मागणी नेटकऱ्यांनी उचलून धरली आहे. आता तर ट्विटरवर ‘ban ganja company’ हा ट्रेंड सुरु झाला आहे.

अमली पदार्थांच्या आहारी जाऊन तरुणाई त्यांचे आयुष्य उद्धवस्त करत आहे. अमेझॉन हा गैरप्रकार उघडकीस येणे चांगलेच झाले. या बेकायदेशीर कृत्याबद्दल अमेझॉनवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here