-
प्रतिनिधी
७४,४२७.४१ कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प सादर करत मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाकांक्षी विकासयोजना मांडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.१९ टक्के वाढ असलेल्या या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनीही अर्थसंकल्पाचे स्वागत करत मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि पायाभूत विकासाला चालना देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट केले आहे.
पायाभूत विकासावर भर – कर वाढीचा बोजा नाही
महायुती सरकारच्या धोरणानुसार भांडवली खर्च ५० टक्क्यांवर नेण्यात आला असून महसुली खर्च ४२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या धोरणामुळे कोणतीही करवाढ न करता विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे, असे दरेकर (Pravin Darekar) यांनी नमूद केले.
(हेही वाचा – BMC Budget 2025-26 : महापालिकेच्या प्रत्येक इमारतींमध्ये सोलर एनर्जीचा वापर; महावितरणाच्या मदतीने राबवणार उपक्रम)
महत्त्वाचे विकास प्रकल्प आणि तरतुदी
- कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, किनारी रस्ता प्रकल्प, रेल्वे पूल आणि खड्डेमुक्त मुंबईसाठी मोठ्या निधीची तरतूद.
- शिक्षण, आरोग्य, वायू प्रदूषण नियंत्रण, पर्जन्य जलवाहिन्या आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी भरीव तरतूद.
- बेस्ट उपक्रमासाठी १,००० कोटींची तरतूद, सार्वजनिक वाहतुकीला बळकटी.
- कोळीवाडे, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, महिला, युवा आणि झोपडपट्टीवासीयांसाठी आर्थिक सहाय्य.
मुंबईचा विकास वेगाने – दरेकर
मुंबईतील नागरिकांसाठी हा अर्थसंकल्प विकासाची नवी दिशा दाखवणारा आहे. पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा करून महायुती सरकारने मुंबईच्या भविष्यासाठी स्पष्ट विकासनीती राबवली असल्याचेही दरेकर (Pravin Darekar) यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community