BJP च्या माजी नगरसेवकांना महापालिका प्रशासन काही भाव देईना…

1179
BJP च्या माजी नगरसेवकांना महापालिका प्रशासन काही भाव देईना…

राज्यात शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार असले तरी मुंबईत शिवसेनेच्या नगरसेवकांना जेवढा चांगला मान दिला जातो, तेवढा मान आता भाजपाच्या माजी नगरसेवकांना मिळत नाही. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्रथमच महापालिकेतील कार्यालयात उपस्थित राहिलेल्या उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या भाजपाच्या माजी नगरसेवकांनी प्रशासनाचे अधिकारी आपले ऐकतही नाही अशी कैफियत मांडल्यानंतर, मंगळवारी (१३ ऑगस्ट) महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांसमवेत लोढा यांनी बैठक घेतली. या बैठकीत माजी नगरसेवकांनी रुग्णालय, दवाखाने, स्मशानभूमी, उद्याने तसेच रस्त्यांची कामे आणि त्यावरील खड्डे याबाबत समस्यांचा पाढाच मांडत प्रशासनाला ही कामे कागदावर नोंदवून घेण्यास भाग पाडले.

(हेही वाचा – काँग्रेसच्या न्याय यात्रेला BJP मुंबईकरांतर्फे विचारणार “खटाखट ५१ सवाल”)

राज्याचे कौशल्य विकास व नाविन्यता मंत्री व उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांसमवेत भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांची संयुक्त बैठक मुख्यालय इमारतीत घेतली. मागील अडीच वर्षे महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे महापालिका प्रशासन व लोकांच्या समस्या यांचा समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुंबईतील टप्पा १२ मधील शौचालयाची पुनर्बांधणी तसेच अनेक शौचालयांची दुरुस्ती याला होणारा विलंब, तसेच काही ठिकाणी मागणी करूनही आपला दवाखाना कार्यरत झालेला नसल्याच्या समस्या माजी नगरसेवकांनी मांडल्या. याबरोबरच विविध उद्यानांचे सुशोभीकरण हा मोठा मुद्दा होता. याशिवाय महापालिका आरोग्य सेवेतील बंद असलेली रुग्णालय तसेच प्रसूतिगृहे यांची पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीची कामे सुर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करून आरोग्य सेवा जनतेस उपलब्ध करून द्यावी, यावर, माजी नगरसेवकांनी लक्ष वेधून घेतले. तसेच रस्त्यांची कामे जलद गतीने व्हावीत, पावसाळ्यात गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

(हेही वाचा – Maharashtra Cabinet Meeting: सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण होणार)

माजी नगरसेवकांनी मांडलेल्या या समस्या तथा प्रश्नांबाबत मंगल प्रभात लोढा यांनी या सर्व विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील सात दिवसांमध्ये याचा आढावा घेतला जाईल असेही लोढा यांनी स्पष्ट केले. या बैठकीस भाजपा माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, प्रकाश गंगाधरे, कमलेश यादव, अभिजित सामंत, हरिष भांदीर्गे, राजेश्री शिरवडकर, ऍड. मकरंद नार्वेकर, रिटा मकवाना, अतुल शाह, दक्षा पटेल, नेहल शाह, अनुराधा पोतदार, बिंदू त्रिवेदी, समिता कांबळे, सारीका पवार, सुनीता यादव, दीपक तावडे व योगिता कोळी अशा जेष्ठ नगरसेवकांसह एकूण ६० माजी नगरसेवक उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.