आणखी एका माशाचा मृतदेह!

126
शनिवारी सायंकाळी मालाड मार्वे येथील दानापानी चौपाटीवर डॉल्फिनचा मृतदेह आढळला. किनारपट्टी साफ करण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवकांना डॉल्फिनचा कुजलेला मृतदेह आढळला.

डाॅल्फिनचा मृतदेह

मुंबई व नजीकच्या भागात गेल्या काही दिवसांपासून सागरी वन्यजीवांच्या मृतदेहाचा सडा आढळून येत आहे. वर्सोवा आणि जुहू किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांत ऑलिव्ह रिडले कासव आणि गदा माशाचा ( डॉल्फिन सदृश्य ) मृतदेह आढळल्याच्या नोंदी आहेत. त्यातच मालाड येथे दानापानी चौपाटीची दर आठवड्याच्या शेवटी साफसफाई करायला जाणाऱ्या देवांग दवे या स्वयंसेवकाला डॉल्फिनचा मृतदेह आढळला. याबाबत तातडीने देवांग यांनी (स्प्रेडिंग अवेरनेस ऑन रेपटाईल्स एन्ड रिहेबिलीटेशन प्रोग्राम ) ‘ सर्प ‘ या प्राणीप्रेमी संस्थेला माहिती दिली. डॉल्फिन हा सागरी वन्यजीव असल्याने ‘ सर्प ‘ या संस्थेने वनविभागाच्या कांदळवन कक्षाला माहिती दिली.

( हेही वाचा: एक्स्प्रेसचा अपघात; लोकल सेवेला फटका, विद्यार्थी मुकले परीक्षेला )

वनविभागाच्या 1926 हेल्पलाईनला माहिती द्या
राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या व्हेल, डॉल्फिन, गदा मासा, ऑलिव्ह रिडले आदी कासवांचे मृतदेह आढळून येत आहेत. सागरी वन्यजीवांना भारतीय वन्यजीव कायदा 1972 अंतर्गत संरक्षण दिले आहे. चौपाटीवर किंवा समुद्रकिनाऱ्यावर सागरी वन्यजीव आढळल्यास किंवा मृतदेह आढळल्यास थेट विल्हेवाट लावल्यास वनगुन्हा ठरेल. तातडीने 1926 या वनविभागाच्या हेल्पलाईन नंबरला कळवा असे आवाहन वनविभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.