मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. राजापूरजवळ असलेल्या शीळ-कोंढेतड या दरम्यान असलेल्या अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले असून सध्या या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या पुलामुळे जवळपास ११ धोकादायक वळणे कमी होऊन प्रवाशांना पुढील प्रवास करण्यासाठी १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे.
( हेही वाचा : राज ठाकरेंचा ‘वसंता’ करणार पुण्याच्या सभेची जंगी तयारी! )
धोकादायक वळणे कमी होणार
या पुलाचे काम नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरू झाले. परंतु कोरोना तसेच अनेक नैसर्गित अडचणींमुळे या पुलाचे काम पूर्ण होण्यास २०२२ उजाडले आहे. उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असून हा पूल पावसाळ्यापूर्वी दुहेरी वाहतुकीस सज्ज होणार आहे. हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेल्यामुळे या पुलामुले जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे. या महामार्गावरील हा एकमेव पूल असून लवकरच याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. अर्जुना नदीवर हा २८० मीटर लांब व सुमारे ३० मीटर रुंद असा हा पूल उभारण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community