Edible Oil Prices : गृहिणींचे बजेट बिघडणार, खाद्यतेलाच्या भावात वाढ

37
Edible Oil Prices : गृहिणींचे बजेट बिघडणार, खाद्यतेलाच्या भावात वाढ

सरकारने आयात शुल्कात वाढ केल्याने सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाच्या महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडणार आहे. तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अचानक खाद्य तेलावरील आयात शुल्कात वाढ केली. कच्चे तेल व रिफाईन्ड असे दोन प्रकारचे खाद्यतेल आयात केले जाते. कच्च्या तेलावर पूर्वीचे आयात शुल्क हे ५ टक्क्यांवरून २५ टक्के एवढे वाढवले गेले आहे. रिफाईंड खाद्य तेलावर देखील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढले. त्यासोबत खाद्य तेलात सरसकट २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. (Edible Oil Prices)

(हेही वाचा – Pune International Airport : पुण्याहून दुबई, बँकॉकसाठी ‘या’ तारखेपासून विमानसेवा होणार सुरू)

यापूर्वी बाजारात पाम तेल सर्वात स्वस्त होते. गोरगरीबांना देखील हे तेल १०० रुपयांपेक्षा कमी असल्याने खरेदी करून त्याचा वापर करणे शक्य होते. तसेच पामतेलाची किंमत सर्वात कमी असल्याने इतर प्रकारच्या खाद्य तेलाचे भाव देखील फारशी वाढ न होता स्थिर राहीले. त्याचा लाभ ग्राहकांना होत राहिला. पेट्रोल, डिझेलप्रमाणे खाद्य तेलाचे भाव महागाईच्या दृष्टीने कमी असणे आवश्यक असते. (Edible Oil Prices)

(हेही वाचा – Amravati News : अमरावतीत १९ दिवसांत ४१ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण)

पण केंद्राने आयात शुल्क वाढवल्याने खाद्य तेलाचे भाव भडकले आहेत. पाम तेल हे पूर्णपणे मलेशिया व इतर देशातून आयात होते. नेमका याच आयातीला शुल्काचा फटका बसला आहे. सर्वात कमी किंमतीचे पाम तेल आयात शुल्काने वाढल्याने इतर खाद्यतेलाची उत्पादने देशांतर्गत असली तरी पामतेलाच्या कारणाने सर्वच खाद्य तेलाचे भाव धडाक्यात वाढले. नवरात्र, दसरा व दिवाळीचा सण पुढील दोन महिन्यात असणार आहेत. नेमके खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणीचे बजेट कोलमडण्याची वेळ आली आहे. दसरा व दिवाळीसाठीची मिठाया, तळीव पदार्थांची बाजारपेठ देखील महागणार आहे. (Edible Oil Prices)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.