मुंबई बंदरात बोटीला जलसमाधी, तिघांना वाचवण्यात यश

114

मुंबईतील बॅलार्ड पिअर बंदरावर मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी एक मालवाहू बोट बुडाल्याची घटना घडली असून, यातील तिघांना वाचवण्यात यश आले आहे.

तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज

बॅलार्ड पिअर या बंदरानजीक एक मालवाहू बोट शनिवारी उघडकीस आले. परदेशातून आलेला माल जहाजावरुन किना-यावर आणण्याच्या कामासाठी ही बोट तैनात करण्यात आली होती. जहाजावरील माल बंदरावर आणताना (शिप टू शोअर) करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही बोट बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्या येत आहे.

(हेही वाचाः पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचा मंडप कोसळला)

तिघांचे प्राण वाचले

दरम्यान या बोटीवर तीन खलाशी तैनात होते. बोट बुडत असल्याचा अंदाज येताच या तिघांनीही वेळीच बोटीतून उड्या मारल्या. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे त्या तिघांचेही प्राण वाचले आहेत. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच जवळच्या मालवाहू बोटीवरील खलाशांनी या तिघांनाही दोरीने वर खेचत त्यांचे प्राण वाचवले.

तपास सुरू

दरम्यान या बोटीला जलसमाधी मिळण्याचे नेमके कारण काय, याचा शोध आता मुंबई पोर्ट ट्र्स्टकडून घेण्यात येत आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्यामुळे ही दुर्घटना घडली का, याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.

(हेही वाचाः भारताची सुवर्ण कामगिरी, 73 वर्षांत पहिल्यांदाच रचला इतिहास)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.