मोबाईलच्या युगात मुलांना मैदानी खेळांचा विसर पडू नये, मुले तंदुरुस्त राहावीत, यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेने श्री. छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी २६ जानेवारी २०२४ पासून ते १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा क्रीडा महाकुंभ सुरू राहणार आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी ही स्पर्धा होणार आहे. या महाकुंभात दोन लाखांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. (Sports Mahakumbh)
वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित श्री. छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२३-२४ चे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत, धगधगत्या मशालीने ज्योत पेटवून शुक्रवारी २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी करण्यात आले. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री व ही स्पर्धचे संकल्पक मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी, राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, उपआयुक्त (शिक्षण) चंदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. (Sports Mahakumbh)
आत्मनिर्भर बनण्याची आकांक्षा
या प्रसंगी बोलतांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राला पारंपरिक आणि साहसी खेळांचा इतिहास आहे. पंजाब, मणिपूरमध्ये तेथील पारंपरिक खेळ महोत्सव होतात. आज श्री. छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच शिवकालीन साहसी खेळांचे आयोजन होत आहे. खेळाडूंसाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. भारताला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याची आकांक्षा आहे. त्यासाठी आपल्याला मातृभाषेसोबतच स्वदेशी खेळांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन बैस (Governor Ramesh Bais) यांनी केले. (Sports Mahakumbh)
महाराष्ट्राला पारंपरिक खेळांची परंपरा
महाराष्ट्रात कुस्ती हा खेळ खूप प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: घोडसवारी, तलवारबाजी, भालाफेक अशा खेळांमध्ये प्राविण्य मिळविले होते. रामदास स्वामींनी युवा पिढीला व्यायामाचे महत्त्व सांगितले. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. याच महाराष्ट्राच्या मातीतून खाशाबा जाधव यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय मल्ल नावारुपाला आले. महाराष्ट्राला पारंपरिक खेळांची परंपरा आहे. मात्र आपल्याकडे अशाप्रकाराचे व्यासपीठ नव्हते. पण आता महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, क्रीडा भारतीने या महाकुंभाचे आयोजन करून ती कमतरता भरून काढली आहे, असे कौतुकाचे उद्गार त्यांनी काढले. (Sports Mahakumbh)
महाराष्ट्रातील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन
श्री. छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ जगाचे लक्ष वेधून घेईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील साहसी खेळांना पुनर्जीवित करण्यासाठी या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच अशा स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, आपल्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे. मात्र त्यांना योग्य वयात, योग्य व्यासपीठ आणि संधी उपलब्ध होत नाही. मात्र आता यापुढे अशा स्पर्धांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. क्रीडाभारतीचे मल्लखांब प्रशिक्षक तथा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त गणेश देवरुखकर म्हणाले, लुप्त होत चाललेल्या पारंपरिक खेळांना या महाकुंभातून नवसंजीवनी मिळाली आहे. याद्वारे प्रत्येक खेळाडू या पारंपरिक खेळांना नक्कीच पुढे नेतील. (Sports Mahakumbh)
(हेही वाचा – Manoj Jarange Patil यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिसुचनेचे काय आहे महत्त्व?)
चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
महाकुंभाच्या उद्घाटनानंतर महाराष्ट्रातून आलेल्या खेळाडूंनी दांडपट्टा, तलवारबाजी, भाला आदी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करून दाखविले. जांबोरी मैदानातच गड-किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. (Sports Mahakumbh)
वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर रंगल्या स्पर्धा
तब्बल २४ दिवस सुरू राहणाऱ्या या क्रीडा महाकुंभात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन गटांत स्पर्धा होत आहेत. वैयक्तिक गटात मल्लखांब, मॅरेथॉन, पंजा लढवणे, मल्लयुद्ध, दंड बैठक, दोरी उड्या, शरीर सौष्ठव या स्पर्धा होतील. तसेच सांघिक गटात लेझीम, लगोरी, मानवी मनोरे, मल्लखांब, लंगडी, रस्सी खेच, विटी दांडू, फुगडी, ढोल ताशा पथक आणि खो-खो आदी स्पर्धांमध्ये खेळाडू सहभागी झाले आहेत, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी सांगितले. (Sports Mahakumbh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community