- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर वैद्यकीय महाविद्यालय (Nair Hospital) आणि रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापका विरोधातच विद्यार्थी डॉक्टरने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची घेत महापालिकेच्या महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समितीने संबंधित प्राध्यापकाला तक्रारदार विद्यार्थिनींचे पुढील शिक्षण होईपर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयातून अन्य महाविद्यालयात बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, असे प्रकार घडत असूनही तसेच याबाबत तक्रारी प्राप्त होऊनही रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी या प्रकरणात दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनाही सक्त ताकीद देण्याची शिफारस समितीने प्रशासनाला केली आहे. मात्र, या प्रकाराबाबत विद्यार्थिनींमध्ये सहयोगी प्राध्यापक आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिष्ठाता यांच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे
औषधशास्त्र विभागाचे सहयोगी यांच्या विरुद्ध नायर वैद्यकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टरची तक्रार प्राप्त झाल्याने यासाठी विशेष गठीत तक्रार समिती गठीत करण्यात आली. या समितीने तक्रारदार विद्यार्थिनीशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. यात तक्रारदार विद्यार्थिनीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तसेच साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतले. साक्षीदारांनी स्वतःच्या पूर्वानुभावरुन व सहयोगी प्राध्यापक वाचवण्याच्या हेतूने साक्ष दिल्याचे सकृत दर्शनी दिसून आल्याचे या विशेष गठीत समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. (Nair Hospital)
(हेही वाचा – काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; CM Eknath Shinde यांचा आरोप)
शिकावू डॉक्टरांमध्ये प्रचंड असंतोष
मुंबई महानगरपालिका कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समितीच्या २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या सभेमध्ये समितीने आपले मत नोंदवले आहे. ज्यात या समितीने तक्रारदार विद्यार्थिनीचे नायरमधील (Nair Hospital) शिक्षण पूर्ण होईपर्यंत संबंधित सहयोगी प्राध्यापक यांची दुसऱ्या महाविद्यालयात बदली करावी. तक्रारदार विद्यार्थिनीच्या कुठच्याही परीक्षेस ते परिक्षक म्हणून येऊ नये हे महाविद्यालयाने सुनिश्चित करावे अशी शिफारस केली आहे. तसेच त्यांच्या पुढील देय वेतनवाढ एक वर्षाच्या कालावधीकरिता हंगामी स्वरुपात रोखण्यात याची. शिवाय त्यांना लेखी ताकीद देण्यात यावी. दुसरे सहाय्यक प्राध्यपक यांचे समुपदेशन करून त्यांना लेखी ताकीद देऊन अध्यापन सेवेत परत रुजू करुन घ्यायला हरकत नाही.
या समितीने असेही नमुद केले आहे की, नायर रुग्णालयातील (Nair Hospital) अधिष्ठात्यांची या प्रकरणाबाबतची भूमिका दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे असे दिसूनही अधिष्ठात्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा आणला, या प्रकरणाची कार्यवाही करण्यात मदत केली नाही आणि वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात दिरंगाई केली आहे. यासाठी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना लेखीत ताकीद देण्यात यावी, असेही म्हटले आहे. या शिफारशीची अंमलबजावणी झालेल्याची कागदपत्रे १५ दिवसांच्या आत या समितीला पाठविण्यात यावी, असेही निर्देश दिले आहेत. नायर रुग्णालयातील अधिष्ठात्यांकडे वारंवार तक्रार करूनही तसेच अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आणूनही अधिष्ठात्यांकडून या तक्रारींची दखल न घेता उलट त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याने आधीच डॉक्टर आणि शिकावू डॉक्टरांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community